विधानसभेच्या भरघोस यशानंतर राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका येत असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षाच्य़ा नव्या धोरणासाठी कार्यकत्यांना घेत या शिबिराचे आयोजन केलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिरादरम्यान जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर हा बदलाचा असल्याने लवकरच राष्ट्रवादीतही संघटनात्मक बदल होतील असे स्वतःच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे.