सोलापुरातल्या एका सर्वसामान्य गॅरेज चालकाच्या मुलींनी MPSC मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलाचा गॅरेजचा तोडका- मोडका व्यवसाय, सहा माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, अशा परिस्थितीत संजीवनी आणि सरोजिनी भोजने भगिनींनी हे यश मिळवले आहे. कामगार वस्ती परिसरात असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणा मधील आठ पत्र्याच्या घरात राहून गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला.संजीवनी भोजने हिने मंत्रालय क्लार्क महसूल विभाग हे पद पटकावले तर सरोजिनी भोजने हिने टॅक्स असिस्टंट पदाला गवसणी घातली.