पंचायत समिती पेणची आमसभा अनेक विषयांनी गाजली. खासदार व आमदार यांनी जोरदार बॅटिंग करत अधिकारी वर्गाला धारेवर धरत, नागरिकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं देण्यात आली. तोडगे काढत त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत आगरी समाज मंच सभागृहात ही आमसभा संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासह प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नव्याने नियुक्त झालेल्या गटविकास अधिकारी सोनाल सूर्यवंशी, जि प माजी सदस्य डी बी पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.स्टील कंपनीचे विविध प्रश्न तसेच इतर प्रकल्पांमुळे प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय आदी प्रश्नांनी ही आमसभा गाजली. १२ वाजता सुरू झालेली आमसभा ४.३० वाजेपर्यंत विविध प्रश्नोत्तरांनी गाजली.