(फोटो सौजन्य: Instagram )
भारताचा सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंग आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना नेहमीच भूरळ घालत असतो. देशभरात त्याचे अनेक कॉन्सर्ट्स अरेंज केले जातात, कॉन्सर्ट्सला नेहमीच चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तसेच इथने अनेक व्हिडिओजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही इंटरनेटवर नुकताच अशाच एका लाइव्ह कॉन्सर्टमधील व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड सिंगर अरिजित सिंग चक्क मराठी गाणं गाताना दिसला.
वास्तविक पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमध्ये नुकताच अरिजित सिंगचा लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला नेहमीप्रमाणे लाखो फॅन्सची गर्दी पाहायला मिळाली. याचवेळी अरिजितने फॅन्सना एक सुखद धक्का दिला. कॉन्सर्ट दरम्यान त्याने अचानक मराठी गाणं ‘जीव रंगला’ गायला सुरुवात गेली जे ऐकून सर्वच थक्क झाले. आपल्या जबरदस्त आवाजाने त्याने मराठी लोकांची मनं जिंकली. त्याचे गाणे सुरु होताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला जे व्हायरल व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते.
दरम्यान जीव रंगला हे गाणं मराठी चित्रपट ‘जोगवा’ यातील आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि गायक हरिहरन यांनी गायलं आहे. तर या गाण्याची निर्मित अजय-अतुल यांनी केली आहे. या गाण्याला आता 13 वर्षे उलटून गेली मात्र आजही याचे स्वर कानी पडले की अंगावर एक शहारा येतो. मराठी गाणं आणि त्यात अरिजितचा आवाज, हे डेडली कॉम्बिनेशन चाहत्यांना फार आवडलं आणि प्रत्येकाच्या मनात घर करून गेलं. पुणे लाइव्ह कॉन्सर्ट्सचा हा व्हिडिओ आता फार वेगात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यामुळे लोक पुन्हा अरिजितच्या आवाजावर घायाळ होत असल्याचे दिसून येते.
याचा व्हायरल व्हिडिओ @photopedia_varsha नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मराठी गाणं खूप छान म्हणतो यार, इमोशनल झालो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शब्द कमी पडेल अरिजित साठी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.