(फोटो सौजन्य: Instagram)
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असा जोडीदार हवा असतो जो निस्वार्थी भावनेने त्याच्यावर प्रेम करेल, त्यांची काळजी करेल आणि जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहील. आजकालच्या या दुनियेत असं प्रेम कुठेतरी हरवत चाललं आहे. अशातच एका आजी-आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक वृद्ध जोडपं सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, यावेळी त्यांच्या हातात फक्त १२०० रुपये होते पण आजींना सोनं खरेदी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड ही त्यांच्या पैशातून कित्येक पटींनी जास्त होती. अशात दुकानदाराने त्यांच्यासाठी जे केले ते पाहून सोशल मीडियावर सर्वच भावूक होऊन गेले आणि लोकांनी हा व्हिडिओ अक्षरशः डोक्यावर नाचवला. व्हिडिओ आता सर्वत्र जोरदार व्हायरल होत असून यात पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
बाप बाप होता है! मुलीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी; चित्तथरारक VIDEO एकदा बघाच
काय घडलं व्हिडिओत?
महाराष्ट्रातील संभाजी नगरमधील गोपिका ज्वेलर्स येथील हा व्हिडिओ आहे. यात एक ९३ वर्षांचे गरीब आजोबा मोठ्या आशेने आपल्या पत्नीला दागिने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात पाऊल ठेवतात. इथे जाऊन ते सोन्याच्या दोन वस्तू खरेदीसाठी निवडतात . यानंतर दुकानदार त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही काय खरेदी केले यांनतर दुकानदार त्यांना विचारतो की, मालक विचारतो की तुम्ही त्यांच्यासोबत किती पैसे आणले आहेत. हे ऐकून आजी दुकानदाराला तिच्या हातातले ११२० रुपये दाखवते. दुकानदार म्हणतो की खूप पैसे आहेत आणि हे ऐकून आजोबा पैसे कमी आहेत असे मानतात आणि मग ते त्यांच्या बॅगेतून दोन गठ्ठे काढतात ज्यात खूप नाणी आहेत.
दुकानदार मात्र त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देतो आणि आशीर्वाद म्हणून दोघांकडून प्रत्येकी १० रुपये घेतो, म्हणजेच एकूण २० रुपयांत तो त्यांना सोन्याच्या दोन वस्तू देऊन टाकतो. दुकानदाराचे हे मोठेपण पाहून आता सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. दुकानदाराचे हे मोठेपण आजी-आजोबांच्याही डोळ्यात पाणी आणते.
व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलेच शेअर करण्यात येत असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मतही व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “साक्षात विठूराई भेटीला आले होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सॅल्यूट दादा तुला”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यार खूपच भारी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.