लोकलमध्ये सीट मिळवण्यासाठी प्रवासी वाट्टेल ते करु शकतात. कधी चालती ट्रेन पकडणं तर धक्काबुक्की करुन सीट मिळवणं हे कायम सुरुचं असतं. मात्र हा प्रकार कमी की काय आता जागेच्या वादावरुन एका पुरुषाने महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सीएसएमटी ते अंबरनाथ या लोकलमध्ये सीटवरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन या पुरुष प्रवाशाने महिलेला बेदम मारायला सुरुवात केली. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लोकलमधील महिला मारहाण प्रकरणातील आरोपीवर कारवाई करा – लता अरगडे#LataArgade #Mumbai #LocalTrainAssault #MarathiNews pic.twitter.com/vrqbOF62l5 — Navarashtra (@navarashtra) May 20, 2025
या सगळ्या प्रकारानंतर महिला प्रवाशांनी सोशल मीडिय़ावर संताप व्यक्त केला आहे. जर इतक्या गर्दीतही महिला सुरक्षित नसतील लोकल ट्रेनमधून प्रवास कसा करायचा असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तसंच पुरुष प्रवाशावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसंच या सगळ्या घटनेनंतर रेल्वे पोलीसांवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. एवढं सगळं होऊनही प्रवासातील कोँणत्याही स्थानकात या सगळ्याची तक्रार दाखल का केली नाही असा सवाल देखील विचारला जात आहे.
खरंतर मारहाण झाली त्या महिलेने या प्रवाशाच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात या व्यक्तीने या महिलेला मारहाण केली आहे, असं कारण या मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे महिलांतच्या सुरक्षेता प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी लता अरगडे यांनी लोकलमधील महिला मारहाण प्रकरणातील आरोपीवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.






