(फोटो सौजन्य: X)
जंगलात शिकारीचे अनेक निराळे आणि आपल्याला थक्क करणारे दृश्य रंगत असतात. आपण हे दृश्य जवळून पाहू शकत नसलो तरी याचे व्हिडिओज मात्र नेहमीच सोशल मिडियावर शेअर केले जातात जे पाहून आपण जंगलातील आयुष्य आणखीन जवळून जाणून घेऊ शकतो. जंगलात जिवंत राहायचं तर शिकार करणं गरजेचं आहे. मोठमोठ्या आणि ताकदवान प्राण्यांच जंगलात वर्चस्व गाजतं. आपली एक चूक इथे आपला जीव घेऊ शकतो आणि असाच काहीसा प्रकार सध्या जंगलाच्या शिकाऱ्यासोबत घडल्याचे दृश्य सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. तहान भागवायला गेलेल्या बिबट्यावर मगरीने हल्ला चढवला आणि अशाप्रकारे पाण्यात खेचलं की पाहणारे पाहतंच राहिले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्कर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जंगलात कधीकधी भक्षकही दुसऱ्या भक्षकांच्या तावडीत अडकतात आणि मग जे घडते ते भयानक असते. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक चित्ता पाणी पिण्ययाच्या उद्देशाने नदीकाठी गेला आहे. पण याचवेळी एक मगर या पाण्यात शिकारीची अपेक्षा घेऊन दडून आत बसलेली असते. चित्ता जसा पाणी पिण्यासाठी जवळ जातो तशी मगर लगेच काही सेकंदातच त्याच्यावर आपला हल्ला चढवते आणि त्याचा जबडा आपल्या तोंडात पकडत वेगातच त्याला पाण्यात खेचून घेऊन जाते. चित्ता मगरीच्या तावडीतूव स्वत:ला मुक्त करण्याचा आतोनात प्रयत्न करतो पण मगरीची पकड इतकी जबरदस्त असते की त्याला काहीच करता येत नाही आणि मगर पाण्यातच त्याला फस्त करुन टाकते. जंगलातील हे थरार दृश्य आपल्याला जंगलातील आयुष्याचा आरसा दाखवून जाते, इथे आपली एक चूक आपलं कीती नुकसान करु शकते हे व्हिडिओत पाहायला मिळतं.
तालाब किनारे रोमांचक नजारा!
शेर पानी पी रहा थातभी घात लगाकर बैठे मगरमच्छ ने बिजली-सी तेजी से हमला बोला और शेर को खींचकर पानी में समा लिया pic.twitter.com/fpcu17yf28
— Suaib Ansari (@suaibansari3131) September 18, 2025
दरम्यान शिकारीचा हा व्हिडिओ @suaibansari3131 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पुढे काय झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे फारच खतरनाक व्हिडिओ आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूपच रोमांचक व्हिडिओ आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.