(फोटो सौजन्य: Instagram)
मानवाची बुद्धी कधी काय शक्कल लढवेल ते सांगता येत नाही. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा साधनांची कमतरता भासते तेव्हा जुगाड एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कामी येते. इंटरनेटवर मानवाच्या अनोख्या आणि निरनिराळ्या जुगाडाचे अनेक व्हिडिओज याआधीही व्हायरल झाले आहेत आणि अशातच आता आणखीन एक थक्क करणारा मजेदार जुगाड इथे व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्तीने नदी पार करण्यासाठी चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांची मदत घेतल्याचे दिसून आले. नदी पार करण्यासाठी बोट नाही म्हणून व्यक्तीने आपली शक्कल लढवली आणि स्वत:ची एक अनोखी बोट तयार केली जिला पाहून सर्वच थक्क झाले. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
प्लॅस्टिकच्या बाटल्या आपण आजवर अनेकदा वापरल्या असतील. या बाटल्या वापरुन झाल्यानंतर आपण त्या कचऱ्यात फेकून देतो. पण याच बाटल्यांचा वापर करुन एका व्यक्तीने चक्क पाण्यात पोहणारी एक बोट तयार करुन दाखवली आहे, व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात दोन व्यक्ती नदीकिनारी असलेली बोट हाताने पाण्यात ढकलताना दिसून येतात. पण ही बोट काही साधीसुधी बोट नसून ती प्लॅस्टीकच्या बाटल्यांपासून तयार केलेली बोट असते. बोटला पाण्यात ढकलताच दोन्ही व्यक्ती त्यावर चढतात आणि जुगाडाने तयार केलेल्या या बोटच्या मदतीने सहज रस्ता पार करतात. व्यक्तीच्या या जुगाडाने आता इंटरनेटवर सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं असून यूजर्स आपल्या मिश्किल प्रतिक्रिया यावर व्यक्त करत आहेत.
दरम्यान हा अनोखा जुगाड हा व्हायरल व्हिडिओ @hansi.kathela नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण बाटली समाज घाबरलेला आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ प्रदूषण कमी करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “टेक्नोलाॅजिया”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.