(फोटो सौजन्य – Instagra
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हिडिओतील दृश्ये हे नेहमीच आपल्याला थक्क करणारे ठरतात तर काही मनाला सुखावून जातात. यातील दृश्ये बऱ्याचदा आपल्या कल्पनेपकडचे ठरतात, ज्यामुळे लोक ते फार आवडीने पाहतात आणि त्यांची मजाही लुटतात. इथे माणसंच काय तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यातील दृश्ये लोक मजा घेत घेत पाहतात. आताही इथे एका क्युट श्वानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील मनमोहक दृश्ये पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. लोक आपल्या पाळीव प्राण्यांचे सुंदर व्हिडिओ शेअर करतात जे सर्वांच्याच मनाला भिडतात. नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओतमध्येही एक कुत्रा कारमध्ये बसून गाण्याच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसून आला. जसजसे गाणे वाजू लागते, कुत्राही आपली मान डोलवू लागतो. म्युजिक वाढले की, कुत्र्याचा जोशही वाढतो आणि आणखीन जोरजोरात आपली मान डोलवत नाचू लागतो. कारच्या विंडो सीटवर बसलेल्या कुत्राचा हा डान्स पाहून अआजूबाजूचे लोकही खुश होतात आणि हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करू लागतात. यातीलच एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. श्वानाचा हा सुंदर डान्स सर्वांच्याच मनात भरला आणि लोक व्हिडिओला भरभरून लाइक्स देऊ लागले.
तरुणाने चुकीचा स्पर्श केला अन् इन्फ्लूएन्सरने खणकन लगावली थोबाडीत; मग पुढे जे घडलं… Live Video Viral
कुत्र्याचा हा मजेदार डान्स @chuckles__wonders नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये श्वानाच्या या क्युट डान्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला हे खूप आवडलं… मी त्यांच्यासोबत नाचल्याशिवाय राहू शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.