(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक निरनिराळ्या घटक व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात तर कधी जुगाड तर इथे कधी काही लाइव्ह घटना देखील व्हायरल होतात ज्यातील एक्सक्लुजिव्ह फुटेज लोकांना थक्क करून सोडते. आताही इथे असाच एक प्रकार घडून आला ज्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. वास्तविक, एक इन्फ्लूएन्सर एक व्हिडिओ शूट करत होती त्यादरम्यान एक मुलगा तिची छेड काढतो, मुख्य म्हणजे तरुणी यावर गप्प बसत नाही तर त्याला रोखून त्याच्या कानशिलात लागवते. ही सर्व घटना समोरील कॅमेरात कैद होते आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातो. लोक आता यावर आपल्या वेगवगेळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जसजसा काळ पुढे जात आहे, तसतशा महिलांवरील अत्याचार, छेडछाडीच्या घटना देखील वाढत आहेत. अशीच एक घटना सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मानसी सुर्वसेसोबत घडून आली. बिल्डिंगच्या स्टेअरकेसमध्ये मानसी एक व्हिडिओ शूट करत होती, यावेळी अचानक एक मुलगा तेथे येतो. त्याला जायला जागा मिळावी म्हणून मानसी बाजूला होते आणि याच वेळी मुलगा पुढे जाताना तिला चुकीचा स्पर्श करतो आणि पुढे जाऊ लागतो. आपल्यासोबत काही चुकीचे घडले आहे, हे जाणवताच मानसी गप्प बसत नाही. ती मुलाला पकडते आणि त्याने केलेल्या कृत्याबाबत त्याला जाब विचारत त्याच्या कानशिलात लगावते. यानंतर ती कॅमेराकडे हात दाखवत हा प्रकार कैद झाल्याचेही तरुणाला सांगते.
दरम्यान हा सर्व प्रकाराचा व्हिडिओ मानसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मानसीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ती एक आपल्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर स्नॅप रेकॉर्ड करत होती. यावेळी एक मुलगा तिथे आला आणि चुकीचा स्पर्श करत तो पुढे जाऊ लागला. मात्र मानसीने त्याला थांबवले आणि त्याच्या कृत्याचा त्याला जाब विचारला. यावर तरुण तर काही बोलला नाही मात्र त्याच्या घरच्यांनी सांगितले की त्याची मानसिक परिस्थिती खराब आहे.
पुढे मानसीने लिहिले आहे की, “मानसिक त्रास असला तर तो काहीही करेल का? हा मानसिक आजार कोणत्या दृष्टिकोनातून दिसतो? लोक माझ्या कपड्यांवरून मला जज करतात, मी चांगले कपडे घालते, तरीही या सर्व गोष्टी का करतात? हे बरोबर आहे का? लाज वाटते या प्रकारच्या लोकांना! लाज वाटते त्या समाजाची जो माणसांच्या आधारावर न्याय करतो. मला १००००% खात्री आहे की मी त्यावेळी साडी किंवा कुर्ता घातला असता तरी हेच घडले असते..!
रोड आहे की कार्पेट? तरुणाने कंत्राटदार आणि प्रशासनाचा केला पर्दाफाश, हातानेच उखडून काढला रास्ता; Video Viral
या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, मजा आली, आता आणखी एक मार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे स्क्रिप्टेड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती थप्पड खूप समाधानकारक होती! त्यामुळे माझ्या आतल्या रागाची समस्या बरी झाली”.