(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. लोक हे व्हिडिओ आवडीने पाहतात ज्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. यात लोक कधी जुगाड शेअर करतात, कधी कोणता स्टंट्स तर कधी कोणत्या घटनेचे दृश्य… हे व्हिडिओ नेहमीच लोकांच्या कल्पनेपलीकडचे असतात ज्यामुळे लोक ते शेअर करू लागतात. आताही एका विचित्र स्टंट्सचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. यातील दृश्ये इतकी आगळी-वेगळी आहेत की ती पाहून तुमच्या तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात एक मुलगा अतिशहाणपणा करत चक्क फेवीकॉलने आपले तोंड चिपकवू पाहतो. तरुणाला वाटते की याने काहीही होणार नाही. काही शुल्लक लाइक्ससाठी तो हे करत असतो मात्र पुढच्याच क्षणी त्याची मस्ती उतरते आणि हा स्टंट त्याला चांगलाच महागात पडतो. व्हिडिओत आपण पाहू शकता, एक मुलगा फेवीकॉल घेऊन आपल्या ओठ चिपवण्याचा प्रयत्न करतो आणि यांनतर तो जेव्हा आपले तोंड उघडू पाहतो तेव्हा त्याचे तोंड पूर्णपणे बंद झालेले असते. तरुण आपले तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो मात्र काही केल्या त्याचे तोंड उघडत नाही. आपले तोंड उघडत नसल्याचे जाणवताच तरुण घाबरतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मुलगा हे सर्व दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.
ऐसा कौन सा चुन्ना काट रहा था इसको🤣 pic.twitter.com/pC90odHoNA
— Arun (@ArunPrayagi1) April 25, 2025
तरुणाचा हा व्हिडिओ @runPrayagi1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात अंगातले सुलेमानी किडे वळवळने” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा कामातून गेला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो अजून काय अपेक्षा करत होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.