सोशल मीडियावर अनेक अजब गजब प्रकार व्हायरल होत असतात. हे प्रकार अनेकदा लोकांना थक्क करून टाकतात. तुम्ही विचारही करू शकणार नाहीत अशा काही गोष्टी यावर व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही पाकिस्तानी व्हिडिओजचाही देखील समावेश असतो. पाकिस्तानातून रोजच विचित्र घटना समोर येत असतात. इंटरनेटवर शेजारील देशाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या मेजवानीची तयारी दिसत आहे. देशातील एका भिकारी कुटुंबाने ही मेजवानी आयोजित केल्याचा दावा केला जात आहे. ही दावत काही साधी सुधी दावत नसून फार दावत होती. याचा खर्च एका सेलिब्रिटीच्या पार्टीलाही लाजवेल इतका आहे.
एवढेच नाही तर, पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी कुटुंबीयांनी वाहनांचीही व्यवस्था केली होती. याशिवाय 2000 वाहनांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली होती. पाकिस्तानातील गुजरांवाला येथील झगी वासू कांगडा समुदायाने त्यांच्या आईच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला होता. या पार्टीवर तब्बल 12 कोटी खर्च करण्यात आले. या आलिशान पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हजारो लोक मोकळ्या जागेत जेवण बनवताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये काही पदार्थ देखील दाखवण्यात आले आहे. गुजरांवालामध्ये झगी वासूने आपल्या आईचा 40 वा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला की करोडपतीही थक्क झाले आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना एका खाजगी टेबलावर आणि खुर्चीवर बसवून जेवण देण्यात आले. पाहुण्यांना दुपारच्या जेवणासाठी सिरी पाये, गरम नान-भात देण्यात आला. रात्रीच्या जेवणात मटण, भात, नान आणि अनेक प्रकारची मिठाईही देण्यात आली. रहवली रेल्वे स्थानकाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये हजारो लोकांनी जेवण केले.
گوجرانوالہ میں جھگی واسوں کینگرہ برادری کے بچوں نے اپنی والدہ کے چالیسویں کی تقریبات کو تاریخی بنا دیا گوجرانوالہ جھگی واسوں کے چھے بچوں نے اپنی والدہ کے چالیسویں کی تقریب پر سوا کروڑ روپے خرچ کیے، 120 سالہ سکینہ بی بی کے 40 ویں کی تقریب میں250 بکرے بھی ذبح کیے گئے۔ چالیسویں کی… pic.twitter.com/ceoevkgd9M — 365 News (@365newsdotpk) November 15, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आता भीक मागणाऱ्या या कुटुंबाने या पार्टीसाठी इतके रुपये कुठून आणले याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या वाढदिवसाला काही राजकीय नेत्यांनीही हजेरी लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कुटुंब गरीब वाटत असलं तरी त्यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याचे समजते. पाकिस्तानी भिकाऱ्याच्या या पार्टीचा व्हिडिओ @365newsdotpk नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या पार्टीबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






