मृत्यू ही अशी एकमेव गोष्ट आहे जी कोणाच्याच हातात नाही. असे म्हणतात, की मृत्यूच्या काही काळापूर्वीच त्या व्यक्तीला आपला मृत्यू जवळ आला आहे हे समजते. हे फक्त माणसांसोबतच नाही तर प्राणी, पक्षी यांच्यासोबतही घडत असते. याचीच प्रचिती देणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सिंहाच्या मृत्यूचा खेळ दिसून येत आहे. आपल्याला अचानक आलेल्या झटक्यांनी तो अस्थिर होतो आणि हताशपणे आपल्या वेदना जमिनीवर लेटून सहन करत बसतो. कदाचितआपले प्राण आता काही क्षणातच जाणार असल्याची प्रचिती त्याला आली असावी.
अलीकडेच जंगलाचा राजा सिंहाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सिंहाला अचानक झटका आल्याचे दिसून येते. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सिंह हा जंगलातील सर्वात शक्तिशाली आणि भयानक प्राणी मानला जातो. मात्र या व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे अशक्त आणि त्रासलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिंहाच्या शरीराचा थरकाप उडत असून, त्याला झटका आल्यासारखे दिसत आहे. ही परिस्थिती पाहून, त्याला ओळखणे कठीण आहे, कारण तो आपल्या ओळखीच्या बलाढ्य सिंहाच्या पूर्णपणे विरुद्ध दिसत असतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिंहाची बिघडलेली प्रकृती पाहता त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र,नवराष्ट्र याला दुजोरा देत नाही. सिंहाला या अवस्थेत पाहून कोणाचाही यावर विश्वास बसणे कठीण आहे. हे दृश्य इतकं अस्वस्थ करणारं आहे की ते पाहणाऱ्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असेही होऊ शकते की सिंहाचा मृत्यू अचानक आजारपणामुळे किंवा शारीरिक समस्येमुळे झाला असावा, जो त्याच्यासाठी अनपेक्षित होता. या व्हिडिओचे सिंहाच्या अशा वागण्याचे कारण पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी सिंहाला झटके येण्याचे कारण त्याच्या तब्येतीची काही गंभीर समस्या असू शकते असे काही लोकांचे मत आहे. जंगलात, सिंहांना अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागतो, जसे की संसर्ग किंवा शरीरातील कोणतीही अंतर्गत समस्या, ज्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सिंहाचा हा व्हायरल व्हिडिओ @free_live_inform नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘यमराज घ्यायला येताच मृत्यूचे भय आधीच दिसू लागले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “कोणताही प्राणी किंवा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा याचा आभास त्याला होऊ लागतो हे न बदलणारे सत्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ”
सगळ्यांना न्यायला फक्त यमराज येतात का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






