(फोटो सौजन्य: X)
फोटोग्राफी एक कला आहे, ज्यात सुंदर दृश्ये कॅमेरात कॅप्चर करुन ठेवल्या जातात. आजकाल फोटोग्राफी कोणत्या एका गोष्टीपुरती मर्यादित राहिली नसून अनेक वेगवेगळ्या प्रकारची दृश्ये कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफी केली जाते. जसं की वेडिंग फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी… यातीलच एक म्हणजे वाइल्डलाइफ फोटोग्राफी. यात जंगलातील, प्राण्यांचे दृश्ये कॅप्चर केले जातात, हे आपल्याला जंगलातील आयुष्य जवळून ओळखण्याची संधी मिळवून देते. फोटोग्राफर जंगलात जाऊन फार शिताफीने प्राण्यांची नजर चूकवत त्यांचे फोटो, व्हिडिओ कॅमेरात साठवून घेतात. आता असं करताना जर त्यांना कोणत्या प्राण्याने पकडलं तर काय होईल याचा विचार करा.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला फोटोग्राफर तिच्या साथीदारांसह जंगलात लपून काही सुंदर दृश्यांच्या शोधात असते आणि याचवेळी जंगलाचा सर्वात धोकादायक शिकारी बिबट्या मागून येऊन त्यांना भेट देतो. घडतं असं की, कुणाचंही लक्ष नसताना अचानक बिबट्या ते काय करत आहेत हे पाहण्यासाठी त्यांच्या शेजारी जाऊन बसतो. व्हिडिओमध्ये बिबट्या शांतपणे काहीही न करता फक्त त्यांच्या बाजूला जाऊन बसल्याचे दिसते, खरंतर फार आश्चर्यकारक आहे कारण बिबट्यासारखा शिकारी माणसांवरही हल्ला करायला मागे पुढे बघत नाही पण या दृश्यात असे काहीच घडत नाही तर बिबट्या गुपचूप फोटोग्राफर जवळ जाऊन बसून ते काय पाहत आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतो. बिबट्याच्या या शांत प्रतिक्रियेने आता सर्वांची मने जिंकली आहेत, लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
“Hey guys! What are we looking at?” 😅 pic.twitter.com/nKQrl8SRkM — Buitengebieden (@buitengebieden) October 15, 2025
दरम्यान बिबट्याचा हा व्हायरल व्हिडिओ @buitengebieden नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, बिबट्या माणसांवर हल्ला करतात अशी कोणतीही नोंद नाही. ते म्याऊ करतात आणि गुरगुरतात. ती फक्त एक मोठी मांजर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर त्याला माहित असते की ते ज्याला शोधत होते ते तोच आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो म्हणत असेल, मी तुमच्या बाजूला असताना तुम्ही कुणाला शोधत आहात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.