(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वे रुळावरील एक दृष्य दिसेल. रुळावर एक रेल्वे थांबलेली असते आणि याच्याच खाली एक कपल बसलेलं असतं. ट्रेन आणि रुळाच्या मध्यभागी असलेल्या भागात ते ठाण मांडून बसतात आणि एकमेकांना प्रेम करु लागतात. दोघेही गप्पा मारतात, एकमेकांना मिठीत घेतात पण तितक्यातच रेल्वेचा हार्न वाजतो आणि ट्रेन पुन्हा सुरु होते. रेल्वेचा आवाज ऐकताच जोडपं भानावर येतं आणि आपला जीव वाचवण्यासाठी दोघेही ट्रेनखालून बाहेर निघतात. काही सेकंदाचा हा थरार अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की, आता काय दोघं वाचत नाही पण वेळीच ट्रेनखालून पळ काढल्याने दोघेही सुखरुप या परिस्थितीतून बाहेर निघतात.
दरम्यान नागरिकांना असं काही करताना आपल्या जीवाचा विचार करायला हवा. दररोज रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू होतो ज्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा सर्वात मोठे कारण ठरते. भारतीय रेल्वे जगातील चाैथे सर्वात मोठे नेटवर्क आहे, जिथून दररोज शेकडो लोक प्रवास करतात. रेल्वे रुळावर फिरणं, बसणं किंवा कोणतेही अनावश्यक कृत्य करणं कायद्यानुसार दंडनीय आहे. रेल्वेच्या कायद्यानुसार असं केल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या घटनेवरुन हे शिकता येते की, कधीही कोणत्या गोष्टीहून अधिक आपवल्या जीवाला प्राधान्य द्या. प्रेम करा पण आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान ठेवा.
इन्हें देखिए, एक लड़का और लड़की रेलवे ट्रैक ट्रेन के नीचे प्रेम प्रसंग में इतने मशगूल थे कि अपनी जान की भी परवाह नहीं की। गनीमत रही कि समय रहते ट्रेन ने हॉर्न दे दिया, नहीं तो एक छोटी सी लापरवाही उनकी जान पर भारी पड़ सकती थी, ऐसी हरकतें न सिर्फ खतरनाक हैं, बल्कि दूसरों के लिए… pic.twitter.com/U6mI70J5Xv — ʀᴜᴅʜʀᴀ ʏᴀᴅᴀᴠ🇮🇳 (@Rudhrayadav001) May 30, 2026
हा व्हिडिओ @Rudhrayadav001 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे बघा एक मुलगा आणि एक मुलगी रेल्वे रुळाखाली प्रेम करण्यातइतके मग्न होते की त्यांना आपल्या जीवाचीही पर्वा नव्हती. सुदैवाने ट्रेनने वेळेवर हॉर्न वाजवला, नाहीतर एका छोट्या चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असता. अशी कृत्ये केवळ धोकादायकच नाहीत, तर त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सदैवाने ते वाचले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “इतके मग्न की त्यांना आयुष्याचीही काळजी नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






