संग्रहित फोटो
या गंभीर समस्येची दखल घेत पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
“परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा वाहिनीची तपासणी करून रहिवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.” — सचिन भोसले, संस्थापक अध्यक्ष, पुणे पँथर सेना.
तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आणि लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न केल्यास, पुणे पँथर सेनेच्या वतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सचिन भोसले व नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांना आवाहन
सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सचिन भोसले यांनी आवाहन केले आहे की, “जोपर्यंत नळांना पूर्णपणे स्वच्छ पाणी येत नाही, तोपर्यंत सर्व नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे.”






