(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, हॉटेल मालकाचा शोध घेणाऱ्या पथकाला मगरीच्या पोटात त्याचा मृतदेह आढळला. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या अत्यंत जोखमीच्या मोहिमेचा शेवट भीषण ठरला. याचे भयावह दृष्य तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. यात ड्राेनवर मालकाचा मृतदेह आणि मगर दोघेही हवेत लटकताना दिसून येतात. न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तामुळे हे प्रकरण चर्चेत आले. मिळालेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय गॅब्रिएल बातिस्ता हे कोमाटी नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. ही नदी मगरींच्या प्रादुर्भावासाठी ओळखली जाते, त्यामुळे ते एखाद्या मगरीचे भक्ष्य बनले असावेत अशी भीती सुरुवातीपासूनच होती.
अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, बचाव पथकाला नदीकाठावर एक असान्य, सुस्त आणि फुगलेली मगर दिसली. संशयाच्या आधारावर पथकाने मगरीला मारुन टाकण्याची परवानगी मिळवली. एका पोलीस अधिकाऱ्याला हेलिकॉप्टरमधून थेट मगरीवर खाली उतरवण्यात आले. त्याने दोरी आणि हार्नेसच्या साहाय्याने मगरीला सुरक्षित केले आणि नंतर हेलिकाॅप्टर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
NEW: Police airlift a crocodile with the body of a 59-year-old businessman inside. Local police in South Africa say they suspected the crocodile ate the man after observing it from drones. They then shot it and airlifted it off. When they landed back on the ground, the… pic.twitter.com/12NBTQbmis — Collin Rugg (@CollinRugg) May 4, 2026
मगरीला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले ज्यात माणसाच्या शरीराचे अनेक अवयव सापडले. यात दोन तुटलेले हात, बरगड्यांचे भाग आणि मांसाचे तुकडे यांचा समावेश होता. एका बोटात घातलेल्या अंगठीमुळे हे अवशेष हाॅटेल मालकाचेच असल्याचा संशय खरा ठरवण्यात आला. तथापि या घटनेचा तपास अजून सुरुच आहे. मुख्य म्हणजे, या तपासात मगरीच्या शरीरात एकूण सहा जोड बुटांचे सापडले. यावरुन परिसरातील आणखी लोकांचा बळी मगरीने घेतल्याचे स्पष्ट होते. हाॅटेल मालकाचा मृत्यू नक्की पाण्यात बुडून झाला की मगरीच्या शिकारीने याची पुष्टी अद्याप झालेली नाही. इतर बेपत्ता लोकांचा शोध लागतोय की नाही हे तपासण्यासाठी आता अधिकारी इतर मगरींचीही तपासणी करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






