(फोटो सौजन्य: Instagram)
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवानंतरही पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना घरी हसण्याची संधी मिळाली आहे. त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांच्या लग्नाच्या समारंभाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री पुष्पा २: द रुल चित्रपटातील ‘अंगारो का अंबर सा’ या हिट गाण्यावर आपल्या पत्नीसोबत नाचताना दिसून आले. त्यांना असे नाचताना पाहून सर्वच थक्क झाले आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले.
हर्षिता केजरीवाल हिचे लग्न तिच्या बॅचमेट आणि तिच्या स्टार्टअप पार्टनर संभव जैनशी झाले आहे. त्यांचे लग्न दिल्लीतील कपूरथळा हाऊसमध्ये झाले, जे एकेकाळी कपूरथळा महाराजांचे निवासस्थान होते. या खास प्रसंगी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या लग्नाच्या संगीतात, राजकारणाबद्दल बोलणारे अनेक दिग्गज त्यांच्या पत्नींसोबत आनंदाने नाचताना दिसले. मात्र मुख्य आकर्षण ठरले ते केरीवाल यांचे नृत्य.
या लग्नाचे संगीत समारंभ आणि इतर अनेक कार्यक्रम दिल्लीतील शांग्री-ला हॉटेलमध्ये पार पडले. या संगीतात अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत नाचताना दिसले. ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों का अंबर सा…’ या गाण्यावर त्याने त्याच्या पत्नीसोबत मजेदार नृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या नृत्याने सर्वांचेच मन जिंकले. हा व्हिडिओ बापाचे आपल्या मुलीवरील प्रेम अधोरेखित करते. या गाण्याचे संपूर्ण नृत्यदिग्दर्शन बिग डे डान्स ग्रुपने केले आहे.
पाकिस्तानात नक्की काय सुरु आहे? लोकांनी अक्षरशः तोंडाने सॅनेटरी पॅड फाडले; Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @thebigdaydance नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक वडील आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप छान आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आम आदमीचे लग्न”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही