दागेस्तान : साप (Snake) हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांना याची खूप भीती वाटते. सापाबाबत आपण आत्तापर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या असेल. त्यामुळे त्याची भीती वाटतेच. पण एक साप असा आहे त्याने झोपलेल्या महिलेच्या तोंडातून पोटात शिरकाव केला. पण याची माहिती मिळाल्यानंतर तेव्हा मात्र डॉक्टर हा साप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. होय, अशी घटना घडलीये… याचा व्हिडिओही (Viral Video) ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे.
Medics pull 4ft snake from woman’s mouth after it slithered down there while she slept. pic.twitter.com/oHaJShZT3R
— All Things Fascinating (@FascinateFlix) November 12, 2022
@FascinateFlix या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महिलेच्या पोटातून साप बाहेर काढतानाचे दिसत आहे. हा साप नेमका गेला तरी कसा असेल हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. तर हा साप महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा महिलेच्या तोंडात घुसला आणि तो तिच्या पोटात गेल्याचं सांगण्यात आलं. पोटात अडकलेला साप काढायचा कसा? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. पण शर्थीचे प्रयत्न करून नंतर डॉक्टरांनी सापाला बाहेर काढलं. हा साप काय छोटा नव्हता तर भला मोठा होता.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेली दिसत आहे. तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच डॉक्टरांनी 4 फूट लांब साप बाहेर काढला. हे पाहून डॉक्टरही आश्चर्याने दोन पावले मागे सरले. या व्हिडिओनं लोकांना आश्चर्य वाटलं की एखादी व्यक्ती इतकी गाढ कशी झोपू शकते की त्याच्या तोंडात साप जातो आणि त्याला ते कळतही नाही.
पोटात त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांकडे अन्…
रशियातील दागेस्तान भागातील ही महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका छोट्या गावात ही महिला इतकी गाढ झोपली होती की, तिच्या तोंडातून एक साप तिच्या पोटात शिरला. तिला थोडा त्रास जाणवल्याने महिला डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातून 4 फूट लांब साप बाहेर काढला. मात्र, हा साप जिवंत होता की मेला होता याची माहिती मिळू शकली नाही.