भयावह!श्वानाचा घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला; आधी जमिनीवर पाडलं अन् मग लचके..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dog Attack on child Viral Video : सोशल मीडियावर रोज मजेशीर व्हिडिओंसह काही भयावह व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका श्वानाने चिमुकल्यावर भयावह हल्ला केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहमध्ये घडली आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. सध्या शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक चिमुकला घराबाहेर खेळत असताना त्याच्यावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला आपल्या घराबाहेर खेळताना दिसत आहे. याच वेळी तिथे एक कुत्रा येतो आणि अचानक चिमुकल्यावर हल्ला करतो. कुत्रा आधी चिमुकल्याला जमिनीवर पाडतो आणि त्यानंतर त्याला चावतो. चिमुकला मोठ मोठ्याने रडत असतो. परंतु त्याला वाचवण्यासाठी कोणीही येत नाही. आसपास कोणीही मोठी व्यक्ती नसते. याच वेळी तिथून दोन बाईकस्वार चालले असतात. त्यांना हे दिसताच ते बाईक थांबवून चिमुकल्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवतात. यामुळे चिमुकल्याचा जीव वाचतो.
मिळालेल्या माहितीनुसार, नंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली होती. परंतु त्याला वेळेत उपचार मिळाल्यामुळे चिमुकला सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गजरौला में घर के बाहर खेल रहे किशोर पर आवारा कुत्ते ने बोला हमला, सीसीटीवी में कैद हुई घटना @dmamroha pic.twitter.com/PLoJzf0wLf
— Aaina Sach ka (@Aainasachka190) August 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Aainasachka190 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करायला लावली आहे. स्थानिक लोकांनी देखील यावर कारवाईची मागणी केली आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.