(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात, जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या थरारक लढती देखील शेअर केल्या जातात ज्यातील दृश्य आपल्या नेहमीच थक्क करते. मात्र आता इथे एक हृदयद्रावक दृश्य व्हायरल झाले आहे जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला. यात हत्तीच्या एका कळपाने चिमुकल्या झेब्राच्या पिल्लावर हल्ला करत त्याला पायदळी तुडवल्याचे दिसून आले. हे दृश्य इतके भयाण होते की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला. हे दृश्य जंगलातील या क्रूरतेने निसर्गाशी असणारी गुंतागुंत दाखवून देते.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक झेब्रा एकटाच गवत चरत असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक हत्तींचा एक कळप त्याच्याकडे येतो. सुरुवातीला असे दिसते की हत्ती त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक मोठा हत्ती झेब्रावर हल्ला चढवतो आणि इतर हत्तीही त्याच्या मागे जातात. झेब्रा त्याचा जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतके भयानक वाटते की ते पाहून पाहणाऱ्यांचा श्वास रोखला जातो. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते मात्र अद्याप कळू शकले नाही मात्र यातील दृश्ये लोकांचा थरकाप उडवत आहेत हे नक्की.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) April 28, 2025
हत्तींना सामान्यतः शांत आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते, परंतु या व्हिडिओमध्ये त्यांची आक्रमक बाजू उघड करतो. हा व्हायरल व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा निसर्गाचा दुःखद भाग आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, फक्त सोंडेने झेब्राच्या मानेवर दाबून त्याला चिरडून मारले?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.