(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणि मुलाच्या संभाषणाचा गोड व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. योगींनी मुलाला विचारले की, तुला काय हवे आहे. अशावेळी सर्वांसमोर न बोलता चिमुकल्याने गुपचूप योगींच्या कानात कुजबुज करत आपली मागणी त्यांना सांगितली. मुलाच्या मागणीवर योगींना इतके आश्चर्य वाटले की त्यांनी पुन्हा एकदा त्याला काय हवं ते विचारलं जेव्हा मुलाने तिच गोष्ट पुन्हा बोलून दाखवली तेव्हा त्यांना हसू अनावर झालं. वास्तविक, मुलाने योगी आदिनाथांकडे त्याला चिप्स आणून देण्याची मागणी केली होती. चिमुकल्याच्या या साध्या मागणीवर तिथे उपस्थित सर्वांनाच हसू फुटलं आणि लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली.
#मुख्यमंत्री के कान में #बच्चे ने क्या कहा !! 😂 pic.twitter.com/vAHqADmNPM — Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) January 15, 2026
हा व्हिडिओ @AhteshamFIN नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो अंकल चिप्स मागत असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चिमुकल्याला कल्पना नसेल की तो मुख्यमंत्र्याशी बोलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ कधीचा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






