एआयचा अनोख उपयोग! नातीनं आजीला दिलं अनमोल सरप्राइज; VIDEO पाहून डोळे पाणावतील (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर, कधी भयावह, कधी चित्र-विचित्र, तर कधी भावुक करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे एआय तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहे. यामुळे मानवाचे आयुष्य सुलभ होत चालले आहे. या तंत्रज्ञामुळे मानवाची अनेक कामे सोपी झाली आहे. परंतु याचे वाईट परिणाम देखील आहे. सध्या सोशल मीडियावर याचा एक भावुक असा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
एआयच्या मदतीने आपल्याला अनेक क्रिएटिव्ह असे फोटो, व्हिडिओ बनवता येतात. याच्या मदतीने एका नातीने आपल्या आजीला एक भावनिक सरप्राइज दिले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आनंदाने रडू कोसळले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एआयच्या मदतीने तयार केलेला एक व्हिडिओ दिसत आहे. यामध्ये तरुणीची आजी आणि त्यांचे दिवंगत पती एकत्र दिसत आहे.
एआयच्या मदतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून आजी खूप भावुक झाल्या आहे. या व्हिडिओमध्ये आजी त्यांच्या पतीसोबत म्हणजेच तरुणीच्या आजोबांसोबत हातात हात घालून चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर आजीच्या डोळ्यात आंनदाश्रू आले आहेत. आजीने आपल्या नातीला मिठी मारली आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @apoorva_vijaykumar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी. मला माहित आहे की तुला आजोबांशिवाय जगणे कठीण आहे. यामुळे मी तुला आठवण करून देण्यासाठी हे केले आहे. आजोबा अजूनही इथेच आहेत. आपल्या प्रत्येत आनंदाच्या क्षणात. आपण त्यांना पाहू शकत नाही, पण त्यांचे आपल्यावरलक्ष आहे, ते आपले रक्षण करत आहेत आणि नेहमी तुझ्यासोबत आहेत.” यावर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.