घड्याळाच्या आत दडलाय खराखुरा व्यक्ती, स्वतःच्या हाताने बदलतो वेळ... पाहून आश्चर्यचकित झाला भारतीय व्यक्ती; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Human Watch Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हिडिओ पाहायला मिळत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये तुम्ही विमानतळावरचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा लोकांना आकर्षित करण्यासाठी विमानतळावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सजावट करण्यात आलेली असते. परदेशातील विमानतळे तर अधिक अद्भुत असतात. सध्या असाच एक परदेशातील विमानतळावरचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. एका भारतीय व्यक्तीने ह्यूमन वॉचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नेदरलॅंड्समधील ॲमस्ट्राडॅमवरील विमानतळावर एक मोठे घड्याळ दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या घड्याळात एक माणूस उभा असलेला दिसत आहे. हा माणूस घड्याळाचा काटा काढत आणि पुसून टाकत आहेत. दर मिनिटांला ही प्रोसेस घडत आहे. घड्याळात एका क्षणी ६.१० वाजले आहेत, तर थोड्या वेळानंतर ६.११ वाजले आहेत. हे एक ॲनिमेटेड घडळ्या असल्यासारखेही वाटत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @skali85 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ३७ हजारांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याची माहिती दिली आहे. अनेकांना हे घड्याळ पाहून आश्चर्य वाटले आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, यातून कठोर परिश्रमसाचा मेसेज मिळत आहे, मला हे घड्याळ खूप आवडले, तर दुसऱ्या एकाने याला म्हणतात प्रत्येक मिनिटाला काम करतो सांगणारे, तर तिसऱ्या एकाने तर हा माणूस २४ तास काम करत असेल, थकत नाही का असा प्रश्न केला आहे. पण हे घड्याळ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Video Viral : जंगल सफारीदरम्यान जीपमध्ये घुसली सिंहणी, पर्यटकांना फुटला घाम; पुढं जे घडलं…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.