Video Viral : जंगल सफारीदरम्यान जीपमध्ये घुसली सिंहणी, पर्यटकांना फुटला घाम; पुढं जे घडलं... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Jungle Safari Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये तुम्ही वन्यजीवांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये हिंसक प्राण्यांचे शिकार करतानाचे, शिकारीचा आनंद लुटतानाचे, तर काही प्राण्यांचे जीवनातील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा तुम्ही प्राण्यांना पाहण्यासाठी जगंल सफारीवर, झुमध्ये देखील गेला असाल. यावेळी अनेकदा काही प्राणी असे काही करतात की पाहून त्यावर विश्वास बसत नाही.
असे म्हणतात माणसांप्रमाणे प्राण्याला देखील प्रेमाजी, जिव्हाळ्याची गरज असते. प्राणी देखील मानवांप्रती प्रेम दाखवताना दिसतात. तुम्ही आंतापर्यंत गोरिलाला मानवाप्रती खास करुन लहाना बाळासाठी असलेली त्याची माया दाखवताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी सिंहीणी असे पाहिलेय का? आता तुम्ही म्हणाल की कसे शक्य आहे, सिंहणी एक हिंसक प्राणी आहे. तिच्या जवळ गेले तर ती आपल्यावर हल्ला करेल. पण तसेच नाही. बऱ्याचदा या प्राण्यांना देखील प्रेमाची गरज असते. मग हे प्राणी त्यांना संभाळणाऱ्या केअरटेकरसोबत लाडात असल्यासारखे वागतात, त्याच्याकडून आपले लाड पटवून घेतात.
पण यावेळी सिंहणी थेट पर्यटांकडे गेली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेलेले आहेत. यावेळी ते गाडीतून फिरत जंगलातील प्राण्यांना बघण्याचा आनंद घेत आहेत. पण याच वेळी अचानक एक सिंहणी भटकत असते. तिला पर्यटकांची गाडी दिसताच ती थेट गाडीच्या दिशेन जाते. गाडीच्या जवळ येताच सिंहीणी गाडीत उडी मारते. यामुळे गाडीतील लोकांचा थरकाप उडतो. लोक घाबरायल लागतात. ओरडायला लागतात. पण सिंहीण त्यांच्यावर हल्ला करत नाही, तर त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून घासू लागते. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षावर करते थोड्यावेळा पर्यटकांचीही भीती जाते.
Bro forgot they were a lion pic.twitter.com/Rjtzw3rGtS
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 16, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @AMAZlNGNATURE या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती सिंहणी असल्याचे विसरली आहे असे लिहिले आहे. तर एका नेटकऱ्याने त्यांनाही प्रेमाची गरज असते असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने हे खूप क्यूट असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्राण्यांचे असे व्हिडिओ शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.