(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओ?
माहितीनुसार, ही घटना इंडोनेशिया येथे घडून आली आहे. व्हिडिओत दिसते की, महिला आपल्या दोन मुलांसह रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असते. रस्त्यावर खूप गाड्या वेगाने धावत असतात ज्यामुळे महिल्या रस्त्याच्या किनाऱ्यावरच उभी राहते. यादरम्यानच दोन मुलांपैकी एक मुलगा रस्ता ओलांडण्यासाठी आपल्या आईचा हात सोडतो आणि वेगाने रस्त्यावर धावू लागतो. मुलगा जसा रस्त्यावर धावायला जातो तितक्यातच समोरुन येणाऱ्या चारचाकीखाली तो अवघ्या काही सेकंदातच चिरडला जातो. यानंतर गाडी ड्रायव्हर ताबडतोब गाडी थांबवतो. मुलाच्या आईला मात्र हे सर्व पाहून धक्का बसतो आणि ती लगेचच जमिनीवर कोलमडते. व्हिडिओत मुलाचा अपघात होताच आजूबाजूची लोक त्याच्या मदतीसाठी धाव घेत असल्याचे दिसून येते. मुलाला सुरक्षितपणे उचलण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यासाठी दुसऱ्या गाडीत ठेवण्यात आले.
TRIGGER WARNING Kejadian di Indonesia pic.twitter.com/voq8W9L4HK — @ (@anthraxxxx) March 4, 2026
सोशल मिडियावर या घटनेचे फुटेज मागील काही काळापासून जोरदार व्हायरल होत आहे. आपली एक चूक आपल्या जीवावर कशी बेतू शकते ते आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ @anthraxxxx नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही चांगले पालक होऊ शकत नसाल, तर मुले करु नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या घटनेतून आपल्याला शिकायला मिळणारा धडा असा आहे की मुलांना नेहमी निरीक्षणाखाली ठेवले पाहिजे आणि रस्ता ओलांडताना काळजी घेतली पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोष पालकांचा आहे, ड्रायव्हरचा नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






