(फोटो सौजन्य: Instagram)
अवकाळी पावसाने आता सर्वत्र थैमान घातले आहे. देशातील अनेक राज्यामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत पावसाळा थंडाव्याचा आनंद घेऊन येत असला तरी यावेळी आपल्या अनेक दुर्दैवी घटना घडून येत असतात ज्यामुळे विशेष खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. लहान मुलांना पावसाचे खरंतर खास आकर्षण असते. मजा लुटण्यासाठी मुलं पावसात भिजायला जातात मात्र सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात एका चिमुकल्याला पावसात भिजणं चांगलंच महागात पडल्याचे दिसून आले. बेभान होऊन पावसात भिजणाऱ्या या चिमुकल्याचा एक क्षणातच जीव गेला आणि त्याच्या मृत्यूचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून यातील थरार दृश्ये पाहून लोक हादरली आहेत. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, पावसाच्या आगमनाने मुलं आनंदित होऊन आपल्या घरासमोर बागडत आहेत. मात्र अशातच एक चिमुकला खेळता खेळता एका खड्ड्यात जाऊन पडतो, हा खड्डा फारच मोठा आणि पाण्याने तुडुंब भरलेला असतो. खड्ड्यात पडल्यांनंतर काही क्षणातच तो दिसेनासा होतो. हे सर्व दृश्य पाहून त्याच्यासोबत खेळात असणारी त्याची मित्रमंडळीही घाबरतात आणि तिथेच रडू लागतात. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कोणीही मोठा माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथे उपस्थित नसतो. व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे चिमुकल्याचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आणि हेच फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
चिमुकल्याचा मृत्यूचा हा थरार @vaishnodevi_maa_2000 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘तुमच्या मुलांची काळजी घ्या’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात असून लोक आता यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्या पालकांना धडा मिळाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पालक निष्काळजी आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.