(फोटो सौजन्य: Instagram)
साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या एका दंशाने तो कुणालाही मृत्यूच्या घरी पाठवू शकतो. हेच कारण आहे की त्याला पाहताच मोठमोठे प्राणीही आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून आपला पळ काढतात. अशातच नुकताच सोशल मीडियावर सापाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक चिमुकला दोन सापांना हातात पकडून खेळण्याप्रमाणे खेळताना दिसून आला. चिमुकल्याचे धाडस आणि त्याच्या हातात टांगणारे ते साप पाहून इंटरनेटवर सर्वांनाच धडकी भरली आणि लोकांना हा व्हिडिओ वेगाने शेअर करायला सुरुवात केली. चला नक्की काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
ज्याचं नाव ऐकताच शरीर थरथर कापू लागतं अशा सापाला चिमुकल्याने आपली जागा दाखवली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन साप घराच्या अंगणात बसल्याचे दिसून येते आणि याचवेळी चिमुकला पायऱ्यांवरून खाली उतरत अंगणात येते. सापांना आपल्या अंगणात पाहताच तो खुश होतो आणि धावत पळत जाऊन सापांना आपल्या हातात पकडतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुलगा फार फार तर चार-पाच वर्षांचा असेल. पण त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाहीये. उलट हे त्याचे रोजचे काम आहे अशा सहजतेने त्याने हे साप पकडले.
या व्हिडीओमध्ये विशेष गोष्ट म्हणजे, साधारणपणे सापाला स्पर्श करताच तो फणा काढतो आणि काही साप तर थेट दंशच करतात. पण या सापांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट ते शांतपणे मुलाच्या हातात पडून राहिले. व्हिडिओतील हे दृश्य पाहून सर्वच अचंबित झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. काहींनी चिमुकल्याच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी सापांच्या शांत राहण्यामागे आश्चर्य व्यक्त केले. हा व्हिडिओ @kalyugpur नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले. “मुलगा म्हणत असेल साप असशील तू तुझ्या घरचा, हे माझं घर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो निश्चितच एका सर्पमित्राचा मुलगा आहे….ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.