(फोटो सौजन्य – X)
मलायका अरोरा रविवारी, 30 मार्च रोजी आयपीएल 2025 चा 11 वा सामना पाहण्यासाठी गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर पोहोचली. इथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगत होता. यावेळी मालयकाचा एका खास व्यक्तीसोबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्यांनी सर्वच थक्क झाले असून सोशल मीडियावर आता मलयकाच्या अफेअरविषयीची चर्चा रंगू लागली आहे. मागील काही काळापासून अभिनेत्री अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यांनतर आता ती दुसऱ्याच व्यक्तीला डेट करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. आता ही अभिनेत्री नक्की कुणाला डेट करत असल्याचा अंदाज आहे ते जाणून घेऊया.
काका… काका आहेत का? कावळा बोलतोय मधुर वाणी, बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? मजेदार Video Viral
गेल्या रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यादरम्यान कॅमेऱ्याचे लक्ष बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराकडे होते. मलायका स्टँडमध्ये बसली होती मात्र यावेळी ती एकटी नव्हती. ती यावेळी राजस्थान रॉयल्सचे माजी मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांच्यासोबत बसून मॅचचा आनंद लुटताना दिसून आली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि चित्रांमध्ये मलायका सीएसकेविरुद्ध राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना संगकारासोबत स्टँडवर बसल्याचे दिसून येत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि कुमार संगकारा यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते अचंबित झाले आणि सोशल मीडियावर त्यांच्या अफेअर संबंधित बातम्या, व्हिडिओ तसेच फोटो व्हायरल होऊ लागले. मात्र त्यांच्या अफेर्सच्या या दाव्यात नक्की किती सत्यता आहे अजून स्पष्ट झालं नाही. युजर्स मात्र आता यावर आपल्या निरनिराळया प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
Malaika Arora with Kumar Sangakkara. pic.twitter.com/6ZGwGXqOFu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2025
Malaika Arora in the rr dugout
Watching csk vs rr❤️#CSKvsRR pic.twitter.com/im9ZweL9tI— Bhargav (@Bhargav76605307) March 30, 2025
सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत. लोक हे व्हिडिओ मजा घेत पाहत असून तसेच अनेकांनी या व्हिडिओंवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांचं तिथे काय काम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते डेट करत आहेत का? आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शहरात नवीन जोडपं”, अजून एका युजरने लिहिले आहे, “तिने काय पोज दिली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.