मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या महाराजगंज येथील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण ११ हजार व्होल्टच्या हाय-टेन्शन विजेच्या खाबांवार चढूनम आरामात झोपला आहे. त्याला खांबावर पाहून स्थानिक लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. यानंतर नागरिकांनी तातडीने वीज विभाग आणि पोलिसांनी याची माहिती दिली. या घटनेमुळे वीज विभागातही खळबळ उडाली होती. वीज विभागाने तातडीने खबरदारी घेत वीजपुरवठा खंडित केला. यानंतर पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने तरुणाला सुखरुप उतरवले.
UP के महाराजगंज ज़िले में बिजली के 11 हजार वोल्ट के पोल पर एक युवक आराम फरमा रहा था…जिसके बाद बिजली विभाग & पुलिस विभाग में हड़कम मच गया…बिजली विभाग ने सप्लाई बंद करवा कर…पुलिस की मदद से घण्टों बाद उसे नीचे उतारा गया…तो पता चला कि शराब के नशे में बिजली नही आने की वजह से… pic.twitter.com/jpDBtmhveH — Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) June 24, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AhteshamFIN या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुण नेशत आल्याचे लक्षात आले. तसेच लाईट गेल्यामुळे त्रासाने चिडून थेट वीजेच्या खांबावर जाऊन बसला होता. सध्या हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






