आज आपण 21’व्या शतकात जगतोय. जसजसा काळ बदलला तसतसे या जगात अनेक बदल घडून आले. मात्र काही गोष्टी मात्र जशाच्या तशाच आहेत. आपण अनेकदा स्त्री-पुरुष समानतेच्या डिंग्या मारतो मात्र आजही देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबायचे नाव घेत नाही. यासंबंधीच्या अनेक बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. याचीच प्रचिती देणारा आता आणखीन एक धक्कादायक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्त्रिला ममतेचे प्रतीक मानले जाते मात्र वेळ आली तर हीच स्त्री रणरागिणीनी बनून भल्यामोठयांना धूळ चाखवू शकते. सध्या असेच काहीसे घडल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दारू पिऊन एक छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी चांगलेच बुकलून काढल्याचे दिसून येत आहे. स्त्री शक्तीचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला हवा. हा व्हायरल व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्स मुलींच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा –प्रेम करायला गेले अन् तोंडावर पडले, घडलं असं काही की आयुष्यभर होईल पश्चाताप, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओबद्दल बोलणे केले तर, व्हिडिओच्या सुरवातीलाच आपल्याला रस्त्यावरील दृश्ये दिसत आहेत. यात एक मुलगी युनिफॉर्म घालून आहे. ती बहुदा एक विद्यार्थी असावी. यावेळी ती कंडक्टरचा हाथ पकडून त्याला हाताने चापट मारताना दिसून येत आहे. एवढेच काय तर पुढे ती चप्पल काढून या कंडक्टरचा बदडायला सुरुवात करते. सर्व घटना घडते तेव्हा तिथे बसमधील आणि रस्त्यावरील लोक मात्र हा सर्व प्रकार स्तब्दपणे पाहत राहतात. ही सर्व घटना रत्नागीरीमध्ये घडल्याचे म्हटले जाते आहे.
हेदेखील वाचा – अतिशहाणपणा चांगलाच नडला! व्यक्ती किंग कोब्राला देत होता ठस्सन, तितक्यात सापाने फणा काढला अन्… Video Viral
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @viralinmaharashtra नावाच्याअकाउंटवरून इंस्टाग्राम शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, नारीशक्ती असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप मजा आली.. मुलींनी फार चांगले काम केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात नारीशक्ती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ताई तू खूप चांगले काम केले यांच्यासोबत असेच वागले पाहीजे”.