भारताच्या शेजारील देश पाकिस्तान नेहमीच आपल्या निरनिराळ्या कारामतींसाठी चर्चेचा विषय बनत असतो. मग ते राजकारण असो, खेळ असो, मनोरंजनसृष्टी असो वा तेथील उद्योगधंदे. पाकिस्तानचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. मागे पाकिस्तानमध्ये ओपन झालेल्या नव्याकोऱ्या मॉलला पहिल्याच दिवशी लोकांनी लुटल्याचा प्रकार समोर आला होता. लोकांनी अक्षरशः हा मॉल संपूर्णपणे लुटला. याचा व्हिडिओ त्यावेळी फार व्हायरल झाला.
सध्या पाकिस्तानचा आणखीन एक धक्कदायक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एक एक विदेशी महिला पाकिस्तानात व्लॉगिंग करताना दिसून येत आहे. मत धक्कादायक बाब म्हणजे तिला एयरपोर्टपासून ते पाकिस्तानच्या रस्त्यावर एकही महिला दिसत नाही. हे सर्व दृश्य पाहून महिलांना आश्चर्याचा धक्काच बसतो. यावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की, पाकिस्तानातील सर्व महिला नक्की गेल्या कुठे?
हेदेखील वाचा – शेवटी रणरागिणीचं ती! दारू पिऊन छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी दिला चोप, चपला काढून बडवलं अन् … Video Viral
व्हिडिओमध्ये झळकणारी महिला एक ट्रॅव्हल व्हिडीओ क्रिएटर ट्रॅव्हल व्हिडीओ क्रिएटर आहे. ती विविध देशांमध्ये जाऊन तेथील खाण-पाण, संस्कृती आणि सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करते. यावेळी ती पाकिस्तान दौऱ्यावर निघाली होती मात्र तेथील सर्व दृश्य पाहून तिला धक्का बसतो. व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअरपोर्ट ते हॉटेल या प्रवासादरम्यान तिला रस्त्यावर एकही महिला दिसली नाही. संपूर्ण प्रवासात तिला आजूबाजूला ती आणि फक्त तिची मैत्रीण अशा फक्त दोनच महिला दिसून येतात. तिने असा हा अनुभव इतर कोणत्याही देशात कधीही घेतला नाही असे तिने सांगितले.
हेदेखील वाचा – प्रेम करायला गेले अन् तोंडावर पडले, घडलं असं काही की आयुष्यभर होईल पश्चाताप, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा Video Viral
पाकिस्तान महिलांसाठी काही नियम आहेत. महिला पुरुषांच्या परवानगीशिवाय बाहेर पडू शकत नाही असे सांगितले जाते आणि याचीच प्रचिती आपल्याला या व्हायरल व्हिडिओतून दिसून येते. हा व्हिडिओ @princesapolynesia नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, सर्व महिला कुठे आहेत? असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खेदजनक आहे, एक असा समाज जिथे महिलांवर एवढ्या नियंत्रण ठेवले जाते की तुम्ही त्यांना रस्त्यावरही पाहू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुली घरात बंद असतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही गंमत नाही की त्या स्त्रिया आपल्याच घरात कैदी बनल्या आहेत”.