देशभरात नुकताच मकरसंक्रातींचा (Makar Sankranti 2022) सण साजरा करण्यात आला. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यात (Kite Flying On Makar Sankranti) एक वेगळीच मजा असते. मकर संक्रांतीनंतर पतंगाशी निगडीत अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ अनेकांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे . कारण एक माकडाने (Monkey Flying Kite Viral Video)अनोख्या अंदाजात पंतग उडवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
On Makar Sankranti, the practice of kite flying in Jaipur is such that even monkeys fly kites.
? ? ? ? ? ? ? ? pic.twitter.com/sF4MdHR5wU— Anil Kr Saini ? + (@anilsaini2004) January 15, 2022
अनिल कुमार सैनी यांनी ट्विटरवर माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जयपूरमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एका घराच्या छतावरून माकड पतंग उडवताना दिसत आहे, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिली आहे. व्हिडिओत माकड एका घराच्या छतावर बसलेलं दिसत आहे. त्यावेळी त्याच्या जवळून पतंग उडत आहे. तेव्हा त्यालाही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही. त्याने लगेच जवळून जाणारा मांजा हातात घेतला आणि पतंग उडवायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पतंग उडवणाऱ्या व्यक्तीने आरडाओरड करत पतंग त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण माकडाने त्यांचं काही ऐकलं नाही.
[read_also content=”वडिलांना कोविडची लस मिळावी म्हणून ६ तास पाठीवर बसवून मुलगा चालला https://www.navarashtra.com/viral/viral-photo-highlights-challenges-of-vaccinating-amazon-man-carries-father-on-back-for-6-hours-to-get-covid-vaccine-in-brazil-nrvb-223496/”]
माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.