फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडिया म्हणजे प्रसिद्धीचे मोफत माध्यम! येथे अशा गोष्टी प्रसिद्ध होतात, ज्या एकाच वेळी संपूर्ण जगभरात डंका वाजवत असतात. अशीच एखादी रील सध्या, सोशल मीडियावर तुफान करत आहे. ही व्हिडीओ एका पक्षाची आहे. हा पक्षी साधारण नाही. तो हयात आहे की नाही? त्यावरही प्रश्न चिन्ह आहे पण त्याच पक्षाची एक व्हिडीओ सोशल मीडियावर थैमान घालत आहे. कदाचित तुम्हाला ही व्हिडीओ सोशल मीडियावर नक्कीच पाहण्यात आली असेल.
इंस्टाग्रामवर @viral_india.official या अधिकृत आयडीने या जळत्या पक्षाची व्हिडीओ अगदी स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती प्रसिद्ध व्हिडीओ चालवली जाते आणि त्यानंतर त्यामागची माहिती देण्यात आली आहे. मुळात, या जळत्या पक्षाचे नाव काय? आणि त्याचे असे जळणे आणि जळूनही थाटात राहणे, यामागचे रहस्य काय? वाचा.
या पक्षाचे नाव आहे ‘फिनिक्स’! हा पक्षी खऱ्या आयुष्यात नसून तो काल्पनिक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सत्य म्हणजे तो प्राचीन कथांमध्ये आढळून येतो, त्यामुळे कदाचित ही प्रजाती अतिशय दुर्मीळ असावी किंवा लुप्त झालेली असावी. सदर Viral व्हिडीओ सत्य आहे की AI? यावर कोणताही दावा आम्ही करत नाही. पण फिनिक्स या पक्षाविषयी सांगायचे झाल्यास हा पक्षी प्राचीन कथांमध्ये अस्तित्वात होता. जेव्हा या पक्षाची शेवटची वेळी जवळ यायची किंवा हा पक्षी म्हातारा/वयोवृद्ध होण्याच्या वाटचालीत असायचा तेव्हा स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी स्वतःला जाळून घ्यायचा. ही त्याची एश्चिक क्रिया आहे त्यामुळे जळतानाही हा पक्षी अगदी थाटात वाटतो.
जळाल्यामुळे या पक्षाचा शेवट होतो. पक्षी शेवटी राखरूपी उरतो पण त्याच राखेतून एका नव्या ‘फिनिक्स’चा जन्म होता. हा फिनिक्स आधीपेक्षा अधिक बलवान, रूपवान आणि तारुण्यात असतो. एकंदरीत, फिनिक्सचा शेवट हा त्याचा शेवट नसून एक नवीन सुरुवात असते. हा पक्षी दिसायला अगदी गरुडासारखा असतो, त्यामुळे याचे उपल्बध असणाऱ्या चित्र पाहताना गफलत होण्याची शक्यता अफाट असते.






