साहस की मृत्यूचा खेळ? पॅराग्लाइडिंग टेकऑफदरम्यान असं काही घडलं की...; VIDEO पाहून येईल अंगावर काटा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पॅराग्लाइडिंग करण आहे. त्याला पॅराग्लाइंडिंग राइड टेकऑफ करण्यासाठी डोंगराच्या कड्यावरुन धाऊन घेत जात आहेत. परंतु खराब हवामानामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे नीट उडता येत नाही. गाइडचे आणि तरुणाचे नियंत्रण सुटल्याने टेकऑफ करताच काटेरी झाडांमध्ये कोसळतात. खाली एक खोल मोठी दरी असते. परंतु सुदैवाने ते आपला तोल सावरतात. कोणलाही गंभीर दुखापत झाला का नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु हा थरारक व्हिडिओ सध्या चिंतेचे कारण बनत आहे.
Never ever do adventure activities in India. This is one of the most unregulated sectors where almost anyone can start an adventure sports business and it goes completely unmonitored. Just look at this video. The weather, the takeoff point, everything made it obvious what the… pic.twitter.com/LDT95dVPVR — Nikhil saini (@iNikhilsaini) July 4, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iNikhilsaini या अकाउंटवर शेअर करुन याची माहिती देण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खराब हवामान असताना ऑपरेटरने उड्डाण का केले? असा प्रश्न लोक विचारत आहे. यापूर्वीही पराग्लाइंडिग करताना भीषण अपघात झाले आहेत. ज्यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पर्यटनस्थळी स्थानिक सरकार आणि ऑपरेटरकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप लोक करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






