UPI पेमेंट अडकलं अन् प्रवाशाला समोसावाल्यांनी ठेवलं धरुन; रेल्वे निघाली तरी सोडना; शेवटी जे घडलं... Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीला यूपीआय पेमेंट फेल झाल्याने दोन समोशाच्या बदल्यात डिजिटल घड्याळ देऊन किंमत चुकवावी लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएपने समोसा विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
अनेकदा ट्रेनमधून प्रवासा करताना काही अशी परिस्थिती निर्माण होते की, अनेकांचा मेंदू काम करणे थांबतो. आपल्याला काय करावे ते सुचत नाही. कधी लोकांची ट्रेन सुटल्यामुळे, तर कधी ट्रेनमध्ये सामान राहिल्यामुळे लोकांची तारांबळ उडते. सध्या एका मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका व्यक्तीचे यूपीआय पेमेंट अडकल्याने त्याची तारांबळ उडाली आहे. समोसा विक्रेत्याला पेमेंट करताना त्याचे पैसे अडकले.
याच वेळी त्याची ट्रेनही सुटली होती. पण विक्रेत्याने प्रवाशाला त्याच्या कॉलरने धरुन ठेवले होते. जोपर्यंत तो पैसे देणार नाही, तोपर्यंत त्याला त्याने सोडले नाही. पण प्रवाशाला पैशा ऐवजी त्याच्याकडचे डिजिटल वॉच द्यावे लागले. या घटनेचा व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, प्रवाशाला विक्रेत्याने धरुन ठेवले आहे. प्रवशाची ट्रेनही सुटली आहे. यामुळे प्रवाशी गोंधळला असून त्याने शेवटी आपले महागडे घड्याळ दोन समोशांच्या पैशाच्या बदल्यात दिले आहे.
किसी कारणवश UPI पेमेंट नहीं हो पाया, फिर समोसे वाले ने युवक की घड़ी उतरवा ली.
pic.twitter.com/jmzMOGyH59 — Priya singh (@priyarajputlive) October 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत माणूसकी संपली असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने यामुळे सोबत पैसेही ठेवावेत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने १०-२० रुपयासाठी बिचाऱ्याची ट्रेनही गेली आणि घड्याळही, त्या समोसा विक्रेत्याला जराही दया आली नाही का? असा प्रश्न केला आहे. सध्या यावर अनेकांनी समोसा विक्रेत्याला चुकीचे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.