(फोटो सौजन्य: X)
रस्ते बांधकामाचे काम निघाले की त्यात घोळ होणार हे जणू जुने समीकरणच. अधिकतारवेळी कंत्राटदार यात घोळ करताना दिसून येतात. पण नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही वेगळेच घडताना दिसून आले. झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात नवीन रस्ता बनवायला घेतला पण रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच गावकऱ्यांनी काँक्रीटचे मिश्रण काढून ते लुटण्यास सुरुवात केली. असे म्हटले जात आहे की रस्ता बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते आणि गावकऱ्यांनी ते खोदण्यास सुरुवात केली, जे पाहून कंत्राटदार आणि बांधकामात सहभागी असलेले कामगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओला आधीच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात कामगार लोकांच्या गर्दीने वेढलेल्या रस्त्यावर काम करताना दिसत आहेत. पण अचानक, कॅमेराचा अँगल बदलतो आणि एक आश्चर्यकारक दृश्य आपल्या समोर येते. एक महिला रस्त्याचे मिश्रण खोदून बाहेर काढत ते पळवून नेण्याचा प्रयत्न करत असते आणि मुख्य म्हणजे याच्या थोड्याच अंतरावर, इतर लोक देखील रस्ता खोदकाम करताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला उभा असलेला कंत्राटदार हे दृश्य पाहून अवाक् झाला होता आणि रागातच कमरेवर हात ठेवून तो हे सर्व दृश्य पाहत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की कोणीतरी रस्ता देखील चोरू शकतो. हे मजेदार दृश्य आता इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून लोकांनी आता यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ये वीडियो झारखंड के कोडरमा से है देखिए कैसे एक तरफ से रोड बन रहा है और दूसरे तरफ से गायब हो रहा है। नोट: बिहार से नहीं है इसीलिए वायरल नहीं होगा। वीडियो को वायरल करें ताकि वैसे लोगों तक वीडियो पहुंचे जो बिहार को आए दिन गाली देते रहते है। pic.twitter.com/PEFKcvoiIa — Bihar Wallah (@BihariWallah) October 18, 2025
या घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @BihariWallah नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जुने बिहारी आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि मग बातमी येईल की रात्रीच्या वेळी चोरी झाली आणि सर्वांना प्रश्न पडेल की हे झालं कसं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या महिलेला सिमेंटची गरज असेल, कंत्राटदाराने नकार दिला असेल, म्हणून ती रस्त्यावरून ते उचलत असावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.