धक्कादायक! क्रिकेट खेळता खेळता अचानक कोसळला अन् परत उठलाच नाही; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादच्या एका नामांकित विद्यापीठात क्रिकेटच्या सामन्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट खेळत असताना एक विद्यार्थी अचानक कोसळला आणि परत उठलाच नाही. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा जागीच हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. शुक्रवारी (04 एप्रिल ) ही दुख:द घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे होते. विनय कुमार मेडचल येथील एमआर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. फिल्डिंग करत असताना विनय कुमार अचानक खाली कोसळला. ही संपूर्ण घटना कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायर होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,कॉलेजच्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरु आहे. याच दरम्यान फिल्डिंग करत असलेला एक व्यक्ती कोणाला तरी हाक मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याआधीच तो खाली कोसळतो. विनय खाली कोसळ्यानंतर सगळे त्याच्याजवळ गोका करुन जमा होतात. सध्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकानी दु:ख व्यक्त केले आहे. अलीकडे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#Hyderabad : क्रिकेट खेलते समय #Btech फाइनल ईयर के #student, विनय कुमार (21) की मौत हो गई । मौत की वजह #CardiacArrest #HeartAttack बताई जा रही है pic.twitter.com/aYoYqNQi4v
— Live Dainik (@Live_Dainik) April 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Live_Dainik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, B. Tech चा अंतिम वर्षाचा विद्यार्थी, विनय कुमार (२१) याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. मृत्यूचे कारण, कार्डियाकअॅरेस्ट, हार्टअॅटॅक असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडे तरुणांमध्ये हृदविकाराचे प्रमाणा वाढत आहे असे एका युजरने म्हटले आहे तर दुसऱ्या एका युजरने हे खूप भयंक आहे असे म्हटले आहे. अं तरुण वयामध्ये जाणं खूप धक्कादायक आहे असे म्हटले आहे. या घटनेने विनय कुमारच्या कुटुंबीयावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.