(फोटो सौजन्य: Instagram)
देशाचा राष्ट्रीय प्राणी जमिनीवर मरत आहे आणि लोक निर्दयीपणे यावेळी पक्ष्याची सर्व पिसे त्याच्या शरीरातून उपटून काढत आहेत , हे दृष्य खरोखरच संतापजनक आहे. रस्त्यावर झालेला पक्ष्याचा हा अंत अपघातामुळे झाल्याची शंका आहे. मृत्यूनंतर त्याला आदरांजली वाहण्याऐवजी लोकांनी त्याच्या शरीरातून पिसे ओढून काढण्यावर अधिक भर दिला. हे दृष्य आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून यूजर्सने यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिय व्यक्त केल्या आहेत. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक मोर रस्त्यावर निपचित पडल्याचे दिसते. रस्ता वर्दळीचा असल्याने गाडीच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तो गंभीररित्या घायाळ झाला होता आणि आपल्या जीवनातील काही शेवटचे क्षण तो मोजत होता. यावेळी काही लोकांनी मोराला रस्त्यावर तडफडताना पाहिलं. त्यांनी त्याची मदत करु पाहिली नाही तर रंगीबेरंगी त्याची पिसे खेचून काढण्याचा क्रुर विचार त्यांच्या मनात सर्वात आधी झाला. व्हिडिओमध्ये लोक निर्दयीपणे मोराच्या शरीरातून खेचूनच पिसे काढताना दिसली जे फार दु:खद आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सने घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडिओ @daily_classmate नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मानवतेसाठी अत्यंत दुःखद. एका मोराला धडक बसल्यामुळे दुखापत झाली होती; परंतु त्याला मदत करण्याऐवजी, काही लोकांनी त्याची सर्व पिसे उपटून काढली आणि त्याला रस्त्याच्या कडेला मरण्यासाठी सोडून दिले.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हेच लोक ही पिसे आपली घरे सजवण्यासाठी वापरतील! अशा घरांना कधीही लक्ष्मी किंवा शांती मिळणार नाही!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानवतेसाठी हे किती क्रुर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आणि मग तुम्ही आयुष्यातील समस्यांबद्दल तक्रार करता. कर्म कोणालाही सोडत नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






