(फोटो सौजन्य: Twitter)
साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याचे विष कुणालाही क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. अशात जंगलातील मोठमोठे प्राणीही त्याच्याशी पंगा घेत नाहीत. सापाला खुले आवाहन देण्याची ताकद फक्त मुंगसात… मुंगूस आणि सापाच्या लढाईचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. त्यातच आता आणखीन एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात साप आणि मुंगूसामध्ये एक थरारक लढत झाल्याचे दिसून आले.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये साप आणि मुंगूस यांच्यातील धोकादायक लढाई पाहायला मिळत आहे. मुंगुसाने विषारी सापाला असा इंगा दाखवला की सर्वजण पाहतच राहिले. घाबरलेल्या सापाचे हे दृश्य फार दुर्मिळ असल्याकारणाने लोकांनी मजा घेत ते पाहिले आणि शेअरही केले, त्यांच्या या लढाईत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, साप आणि मुंगूस आपल्या चपळाईने एकमेकांवर हल्ला करतात. हे दृश्य इतके रोमांचक होते की, लोकांना ते कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटले नाही. दोघेही आमने-सामने उभे राहून एकमेकांवर हल्ला करत होते. यावेळी सुरुवातीला सापाच्या डोळ्यात भीती देखील दिसून येते. साप आणि मुंगूस एकमेकांना सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. साप वारंवार मुंगूसवर हल्ला करत होता, परंतु प्रत्येक वेळी मुंगूस चुकून त्याच्या मानेवर हल्ला करत होता. दोघांमधील हाणामारी एवढी भीषण होती की, जणू जंगलातच एखादे मोठे नाटक सुरू आहे. मुंगूसाची चपळता आणि सापाच्या धूर्तपणाचा हा खेळ पाहून शेवटी कोण जिंकणार याचं आश्चर्य लोकांना वाटतं. लोक कमेंटमध्ये म्हणत आहेत की त्यांनी असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नाही आणि हे दृश्य खरोखरच मनोरंजक आहे.
Mongoose vs Big Snake fight 😱
Who do you think will win?? pic.twitter.com/aRpEEyiOWJ
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 6, 2025
मुंगूस सापाच्या लढतीचा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 13 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुंगूस विषाविरुद्ध चांगली प्रतिकारशक्ती देतो… त्यामुळे त्याची तुलनाच होत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नागाचा हल्ला खूप हळू असतो. मुंगूसाला एका विषारी सापासमोर उभे करा जो गुंडाळलेल्या स्थितीतून खूप वेगाने हल्ला करतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.