(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक गमतीदार व्हिडिओज व्हायरल होत असतात जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. तुम्ही इंटरनेटवर ऍक्टिव्ह असाल तर हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इथे प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील अनेक व्हिडिओ शेअर होतात. आताही असाच एक मजेदार व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक विशालकाय हत्ती चिमुकल्या बेडकाला पाहून घाबरून पळत असल्याचे दिसून येत आहे जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. बेडकाची एंट्री होताच गजराजाने काढलेला पळ तुम्हाला पोट धरून हसवेल. चला व्हिडिओत काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
हत्ती हे शरीराने विशाल दिसत असले तरी त्यांचा स्वभाव हा अधिकतर शांत असतो. हत्ती हे नेहमीच आपल्या माजमस्तीत मग्न असतात, ते दिसायला मोठे असले तरी स्वभावाने खोडकर प्रवृत्तीचे असतात. व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या आंघोळीची मजा लुटताना दिसून येत आहे. याचवेळी अचानक तिथे एक बेडूक येतो आणि हत्तीजवळ जाऊ लागतो. मग काय गजराज बेडकाला पाहतात घाबरतात आणि उलटे पाय घेऊन तिथून बेडकापासून दूर पळू लागतात. इवल्याश्या बेडकाला पाहून हत्ती घाबरला आणि अशी मागे पावले घेऊ लागला की पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले. हत्ती हा बेडकाला घाबरू शकतो याचा विचार कुणीही केला नव्हता म्हणूनच त्याला असे घाबरून जाताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का मिळाला. हत्तीच्या या रिॲक्शन फक्त युजर्सनाच नाहीय तर त्याचा मालकालाही हसू आणले ज्यामुळे हा व्हिडिओ आणखीनच हास्यास्पद बनला. युजर्सने हत्तीच्या या घाबरट रूपाची मजा लुटली आणि हा व्हिडिओ जोरदार शेअर केला.
गजराजाचा हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते घाबरत नाहीत, ते इतर प्राण्यांबद्दल अत्यंत सहानुभूतीशील असतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो घाबरत नाहीये, तो लहानशा जीवासाठी काळजी करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे त्याची हेअर स्टाईल तर बघा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.