सौजन्य - istock
अमेरिका : ऐकावं ते नवलच! सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. नुकताच अमेरिकेतील समुद्रकिनाऱ्यावरील गुलाबी रंगाच्या डॉल्फिनचा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत दुर्मिळ असा ‘गुलाबी’ डॉल्फिन दिसला आहे. सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ खरा आहे कि खोटा यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
Rare pink Dolphin spotted off the coast of North Carolina! pic.twitter.com/qTQQCgZvU3
— Facts matter (@1800factsmatter) June 18, 2024
या गुलाबी डॉल्फिनची अनेक छायाचित्रे सध्या व्हायरल होत आहेत. छायाचित्रे पाहून नेटकरी कोड्यात पडले आहेत. ही छायाचित्रे ‘खरी’ आहेत कि एआय जनरेटेड असा सवाल नेटकाऱ्यानी केला आहे. व्हायरल झालेले फोटो खरे कि खोटे आहेत याची पडताळणी एच.टी.कॉम अजूनसुद्धा करू शकले नाही. एक्स हँडल @1800factsmatter यावर या दुर्मिळ डोल्फिनचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. त्यात ‘नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन दिसला!’ असा दावा करण्यात आला आहे.
या छाचित्रांमध्ये हे गुलाबी रंगाचे डॉल्फिन अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना समुद्रात ‘सर्फेसिंग आणि डायव्हिंग’ करताना दिसत आहेत. या पोस्ट वर एकाने कंमेंट केली आहे की, हे फोटो एआय जनरेटेड नाहीत आणि गुलाबी डॉल्फिन हे नेहमी दिसत राहतात. शेवटचे काही वर्षांपूर्वी लुईझियानाजवळ दिसले होते.
या अशा गुलाबी रंगाच्या माशांना अल्बिनो असे म्हणतात. जे नेहमी निसर्गात पाहायला मिळतात. त्यांच्यात रंगद्रव्ये (मेलॅनिन पिगमेंट) नसल्यामुळे असे पशु त्यांच्या प्रजातीपेक्षा रंगाने वेगळे दिसतात. असे अल्बिनो डॉल्फिन मासे फार दुर्मिळ असल्याने क्वचितच पाहायला मिळतात.