(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्या मनोरंजनाचे काम करतात आणि म्हणूनच फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. दरम्यान आताही इथे नवीन आणि सर्वांच्या काळीजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्य तुमच्या अंगावर काटा आणतील. वास्तविक, व्हिडिओमध्ये एक मुलगी सिंहाला छेडताना दिसून येत आहे. जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहासोबत पंगा घेणं खरंतर फार महागात पडू शकतं आणि असंच काहीस मुलीसोबतही घडून आल्याचं व्हिडिओत दिसून आलं. सिंहाला छेडताच त्याने मुलीसोबत असं काही केलं की पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक मुलगी काचेच्या बॉक्समध्ये बसून बाहेर उभ्या असलेल्या सिंहाला हिणवत असते. सिंह तिच्याकडे एकटक बघत असतो आणि मुलगी काचेच्या बॉक्समध्ये बसून त्याला हातवारे करून हिणवत असते. परिणामी सिंह भडकतो आणि पूर्ण ताकदीने काचेच्या पेटीवर पंजे मारून त्याला फोडून टाकतो. आता हा काचेचा बॉक्स फुटताच मुलगी यातून बाहेर पडते आणि क्षणाचाही विलंब न करता सिंह तिला पकडून मागे खेचून बाहेर काढतो. व्हिडिओमध्ये पुढे अनेक मजेदार गोष्टी घडतात ज्या तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात. व्हिडिओमध्ये सिंहाने मुलीला पकडलेलं असतानाच तिथे एक माणूस सिंहाचा वेष करून तिथे येतो आणि मुलीला पकडू लागतो. अशात मुलगी जमिनीवर पडलेली असते आणि सिंह आणि सिंहाचा वेष घेतलेल्या व्यक्तीने तिला पकडलेलं असतं.
हे सर्वच दृश्य कोड्यात पाडणार असलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो की, हे सर्व खरं नसून हा AI च्या मदतीने क्रिएट केलेला व्हिडिओ आहे. व्हिडिओतील दृश्य इतकी खरी वाटत आहे की सुरुवातीला हा व्हिडिओ खरा आहे असेच सर्वांना वाटू लागते पण जसजसा याचा शेवट जवळ येतो तसतशी याची सत्यता समोर येते आणि आपल्याला हा व्हिडिओ फेक असल्याचे समजते. हा AI व्हिडिओ असला तरीही लोक आता या व्हिडिओची चांगलीच मजा लुटत आहेत.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @fullwarp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप अनपेक्षित होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी थोड्यावेळासाठी घाबरलो होतो भावा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते निर्माण करण्यासाठी प्रॉम्प्ट काय होता याबद्दल खरोखर उत्सुकता आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.