तामिळनाडूतील (Tamilnadu) सेलम येथे झालेल्या दोन बसच्या अपघातात (Bus Accident) ३० जण जखमी झाले आहेत. बसच्या आत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. (Viral Video Of Bus Accident) जखमींना सेलम आणि एडप्पाडी येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
#WATCH | Tamil Nadu: Two private buses collided head-on with each other in Salem district; several reported to be injured. Further details awaited. (Source Unverified) pic.twitter.com/8FAJ0KRizk — ANI (@ANI) May 18, 2022
मंगळवारी संध्याकाळी एडप्पाडीपासून ३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसची तिरुचेंगोडे येथून जाणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला धडक बसल्याने अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर बसचा चालक उडून बाजूला पडला. चालकाच्या बाजूला बसलेला प्रवासी जोरात बसच्या समोरच्या काचेला आदळलेला व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
[read_also content=”राखी सावंतच्या आयुष्यात नव्या बॉयफ्रेंडची एन्ट्री, नाव माहिती आहे का ? https://www.navarashtra.com/entertainment/rakhi-sawant-in-a-relationship-with-adil-khan-durrani-nrsr-281407/”]
अपघातानंतर, सर्व जखमींना सेलम आणि एडप्पाडी येथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
एक खासगी बस ३० प्रवाशांसह इडाप्पाडीहून सांकारीकडे जात होती तर तिरुचेंगोडे येथील केएसआर संस्थेची महाविद्यालयीन बस ५५ विद्यार्थ्यांसह सांकारी मार्गे इडाप्पाडीकडे जात होती. दोन्ही बसेस जेव्हा एडप्पाडी – सांकारी महामार्गावरील कोझीपन्नई बस स्टॉपवर पोहोचल्या तेव्हा त्यांची समोरासमोर जोरात धडक झाली.






