(फोटो सौजन्य: Instagram)
शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपली मदत करते. व्यक्ती कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो. पूर्वीच्या काळी मुलींना जास्त शिकवलं जात नसे ज्यामुळे आयुष्यभर त्यांना अशिक्षित राहावं लागेल. पण काहींनी आपल्या आयुष्याचं हे सत्य नाकारलं अन् वृद्धत्वातही शिक्षित होण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर ‘आजीबाईची शाळा’ आता जोरदार व्हायरल होत आहे. नावाप्रमाणेच या शाळेत तुम्हाला सर्व वृद्ध महिला दिसून येतील. वय वाढलं पण मनातली शिक्षणाची आवड संपली नाही आणि म्हणूनच जीवनाच्या या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी शिक्षित होण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, या सर्व वृद्ध महिला आपल्या मर्जीने आणि आवडीने शिक्षणासाठी शाळेत येतात. त्यांच्या मनात जिद्द आणि डोळ्यात तुडुंब भरलेली शिक्षणाची आवड व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. लहानपणी शिक्षण घेता आलं नाही आणि आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी 30 हुन अधिक महिला जिद्दीने शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. मनात जिद्द मोठी असेल तर त्याला कोणतंही बंधन अडवू शकत नाही. शिक्षणाचे महत्त्व आपल्या जीवनात किती मोठं आहे हे आपल्याला या व्हिडिओतून समजतं. दरम्यान आजींच्या शाळेच्या या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांनाच मोहित करून टाकलं आहे. अनेकांनी आजींच्या या शाळेची प्रशंसा केली आहे तर काहींनी आजींच्या या जिद्दीला सलाम ठोकला आहे.
बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral
आजींच्या शाळेचा हा व्हिडिओ @sidiously_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आजीबाईची शाळा मध्ये आपले स्वागत आहे – जिथे शिक्षणाला मर्यादा नाही. मुरबाड येथील योगेंद्र बांगर सरांनी सुरू केलेली ही शाळा दर शनिवारी आणि रविवारी फांगणे गावातील आजींना मोफत मूलभूत शिक्षण देण्यासाठी उघडते. या महिलांनी आयुष्यात कधीही अभ्यास केला नाही आणि इथेच त्या अपूर्ण स्वप्न पूर्ण करत आहेत. हे आपल्याला खूप काही सांगून जाते की, शिकण्याची आवड कोणत्याही वयाच्या किंवा सीमांच्या मर्यादेत अडकून राहू नये’.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






