(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओतील माहितीनुसार, ही घटना फ्रिस्को परिसरातील भारतीय स्थलांतरितांविरुद्धच्या अमेरिकन लोकांच्या संतापाचा परिणाम आहे. मागील काही काळापासून फ्रिस्को परिसरात भारतीयांची संख्या फार वाढली आहे ज्यामुळे अमेरिकन लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि द्वेषाची भावना निर्माण झाली. यामुळेच व्हिडिओत भारताविषयी आणि भारताविषयी संताप व्यक्त केला जात होतो आणि यातच तरुणाने तिरंगा फाडून भारतीयांवर आपला राग व्यक्त केला. दरम्यान आपल्या वैयक्तिक वादासाठी कोणत्याही देशाचा राष्ट्रध्वज फाडणे ही चुकूची गोष्ट ठरु शकता. प्रत्येक देशासाठी आपला राष्ट्रध्वज हा अभिमान, बलिदान आणि एकतेचे प्रतीक असते. याचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते.
FRISCO: “F*ck India! F*ck India!” A Texas resident @Channel6ixNEWS rips an Indian flag in front of city hall Voicing anger against the Indian immigration invasion in north Dallas pic.twitter.com/N6Ec0oVSUT — E (@ElijahSchaffer) June 3, 2026
परदेशी पर्यटनाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच आता सोशल मिडियावर यूजर्स रागाने संतापून उठले आहेत. कीहींनी अमेरिकन नागरिकाच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी त्यांच्या विचारसरणीवर प्रश्न केले. हा व्हिडिओ @ElijahSchaffer नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तू एक भित्रा माणूस आहेस; तुझ्या समोर असलेल्या मोजक्या लोकांना खूश करण्यासाठी तू हे करत आहेस. यामुळे अमेरिका पुन्हा महान बनणार नाही. याचे परिणाम भोगावे लागतील; त्यासाठी वाट बघ…”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुमची वाट जिहादी लावणार आहेत, भारतीय नव्हे-अरे मूर्खांनो!” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतीयांबद्दल इतका द्वेष का? भारतीय अमेरिका घडवण्यात मदत करत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






