(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
हत्ती हा शरीराने विशालकाय प्राणी असला तरी मनाने तो हळवा आहे. हत्तीचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात त्याची खोडकर वृत्ती दिसून आली. ते सहसा माणसांना त्रास देत नाहीत आणि त्यांच्यासोबत सहज मित्रत्वाचा हात पुढे करतात. व्हिडिओत काही पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटताना दिसले. जंगलातून जात असतानाच त्यांच्या वाटेत हत्तींचा कळप आला ज्याला पाहण्यासाठी ते थांबले. याचवेळी एक छोटा, क्यूट हत्ती पर्यटकांच्या गाडीसमोर येऊन उभा राहिला आणि आपली इवलीशी सोंड हलवत तो त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करु लागला.
हत्तीचे गोंडस रुप पाहून पर्यटक घाबरले नाही तर आणखीनच खुश झाले आणि त्यांनी हे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करु पाहिले. व्हिडिओ पाहताना वाटले जणू छोटा हत्ती म्हणत आहे की, दूर व्हा, इथून निघून जा, नाहीतर याचा परिणाम वाईट होईल. हत्तीने घाबरवण्याचा प्रयत्न तर खूप केला पण परिणामी तो सर्वाच गोंडस म्हणून समोर आला ज्याला पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हूस आलं.
Baby Elaphant trying to scare tourists away 🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/z9sWIP6Psi — 😈 Xavier ✞ (@RealXavier011) May 21, 2026
हा व्हिडिओ @RealXavier011 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘पर्यटकांना घाबरवून पळवून लावण्याचा प्रयत्न करणारा हत्तीचा पिल्लू!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्याने केवळ कळपातील इतर हत्तींकडून जे पाहिले, त्याचीच नक्कल केली आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोजिरवाणा हत्तीचा पिल्लू. त्याची आई येऊन म्हणाली, “असं करायचं नसतं!, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो खूपच गोड आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






