नियम गेले चुलीत! एकाच बाईकवर ९ जणांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून डोकं चक्रावेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे. त्याच्या मागे एक महिला बसलेली आहे. व्यक्ती बाईकच्या टाकीवर बसला असून दोघांच्या मध्ये तब्बल ७ लहान मुळे बसलेली आहे. एकाच दुचाकीवर ९ जण प्रवास करत आहे. त्याच्या मध्ये दोन मुली बसल्या असून त्या दोघींच्या हातात एक एक बाळ आहे. तर मागे बसलेल्या महिलेने दोन्ही कडेवर दोन बाळांना घेतलेले आहे. संबंधित चालक दुचाकीच्या टाकीवर बसून गाडी चालवताना दिसत आहे.
Bro’s building his own football team. pic.twitter.com/49WhsUbcJE — axhiiiiii (@Abhishek88548) July 6, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Abhishek88548 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताचा काही क्षणांतच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भावाने तर थेट फुटबॉलची टीमच तयार केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा केवळ एक मुर्खपणा आहे स्वत:च्या आणि मुलांच्या जीवाशी खेळू नका असा सल्ला दिला आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हे खूप धोकादायक असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






