व्हायरल जोक्स, हसून हसून लोळाल! (फोटो सौजन्य - ChatGPT)
विनोद-१
सासू: सून, तू खूप हळू काम करतेस
सून: आई, तुम्हीच म्हणाला होतात की घर सांभाळायचं असेल तर हळूवारता जपायला हवी
विनोद-२
सासू: अगं जरा, बाजारातून बटाटे आण.
सून: हो, आई, किती किलो?
सासू: तुला आवडेल तितके आण गं
सून: आई, तुम्हाला माहीत आहे ना मला काहीच आवडत नाही!
विनोद ३
मुलगा: व्वा! आई, तू तुझ्या सुनेचा जीव वाचवलास, नाहीतर आज चक्क जळली असती ती
सासू: बाळा, मी माझ्या सुनेला नाही, मी माझी स्वतःची साडी वाचवली. सून तर मी दुसरी पण शोधू शकते
विनोद ४
सासू सुनेला: ही कसली सून आहे, सकाळी इतक्या उशिरा उठते! अगं उठ, कुंभकर्ण… सूर्य उगवला आहे
सून (कुशी बदलत) – कशाला काळजी करताय आई, सूर्य तर झोपतो पण माझ्या आधी मग माझ्या आधी उगवला तर बिघडलं कुठे?
सासूने डोक्यावर हातच मारला!
विनोद ५
सासू – मी तुझं मराठी ऐकून मगच ठरवेन की, तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही? मला सांग तुझं शिक्षण किती आहे?
सून – नेत्र नेत्र चहा
सासू – म्हणजे काय गं?
सून – आयआयटी
सासू तर डायरेक्ट कोमातच गेली
विनोद-६
लग्नानंतर पहिल्यांदाच सून स्वयंपाकघरात गेली आणि पाककृतीचे पुस्तक वाचून स्वयंपाक करू लागली. थोड्या वेळाने जेव्हा सासूने फ्रिज उघडला, तेव्हा तिने डोक्याला हात लावून विचारले, “तू ही मंदिराची घंटा फ्रिजमध्ये का ठेवलीस?”
सून म्हणाली, “आई! पुस्तकात लिहिले आहे की मिश्रण तयार केल्यावर ते एक ‘घंट्या’साठी फ्रिजमध्ये ठेवावे.”
क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral
विनोद-७
एका शहरी मुलीचे लग्न गावात झाले. सकाळी लवकर तिच्या सासूने तिला गायीला चारा खायला सांगितले. गायीच्या तोंडातून फेस आलेला पाहून मुलगी घरी परतली.
जेव्हा सासूने विचारले की काय झाले, तेव्हा सून म्हणाली, “गाय अजूनही कोलगेट चघळत आहे.”
विनोद-८
सासूने सुनेला विचारले, “तुझा भाऊ आजकाल काय करत आहे?”
सुनेने लगेच उत्तर दिले, “त्याने दुकान उघडले होते, पण आता तो तुरुंगात आहे.”
सासूने आश्चर्याने विचारले, “त्याने कसलं दुकान उघडलं?”
सून म्हणाली, “अहो सासूबाई, त्याने ते दुकान हातोड्याने उघडलं, नाही का? म्हणून तो तुरुंगात आहे”
विनोद ९
सासू सुनेला म्हणाली, “माझ्या डोक्यात खूप दुखत आहे.”
सून म्हणाली, “आई, जेव्हा तुम्हाला डोकेदुखी होते, तेव्हा थोडा वेळ तुमच्या मुलीशी बोला”
सासूने आश्चर्याने विचारले, “का गं बाई?”
सून म्हणाली, “अरे तुम्ही ऐकलंच असेल की विषच विषाला मारतं.”






