बोटिंग करताना भल्यामोठ्या व्हेल माशानं गिळलं अन्...; पुढे जे घडलं पाहून व्हाल हैराण, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र तर कधी अंगावर काटा आणणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असले अनेकांना साहसी गोष्टी करण्याची खूप हौस असते. कोणाला गिर्यारोहन तर कोणाला बोटिंग, राफ्टिंग यासांरख्या अनेक साहसी गोष्टी करायला आवडतात.
असाच एक व्यक्ती समुद्रात बोटिंग करण्यासाठी गेला होता. पण यादरम्यान त्याच्यासोबत असे काही घडलं की, अनेकांना धक्काही बसला आहे आणि हैराण ही झाले आहेत. खरं तरं समुद्रात कधी कोणता मासा आपल्यावर हल्ला करेन सांगणे कठीण आहे. याच व्यक्तीवर देखील एका भल्या मोठ्या व्हेल माशाने हल्ला केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती समुद्रात बोटिंग करत आहेत. समुद्र अक्षरश: खवळलेला आहे. पण हा व्यक्ती कोणतीही भिती न बाळगता लांटांना चिरत पुढे जात आहे. हा व्यक्ती अगदी अनुभवी असल्याचे दिसते. यावेळी एक धक्कादायक घटना त्याच्यासोबत घडली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक भला मोठा व्हेल मासा अचानक त्याच्या मागे येतो आणि त्याला एका झटक्यात गिळून टाकतो. हो तुम्हाला असे वाटेल की, काय घडलं नक्की त्याच्यासोबत पण याचवेळी पुन्हा एकदा असे काही घडते की पाहू हैराण व्हाल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Humpback whale swallows kayaker off Chile before releasing him. pic.twitter.com/UuUatMGUxN
— The Associated Press (@AP) February 13, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
तुम्ही पाहू शकता की, व्हेल माशाला पाहताच हा व्यक्ती तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी आपला जीव वाचवण्याच्या नादात हा व्यक्ती बोटीतून समुद्रात पडतो. व्हेल मासा संधी साधून त्याला गिळून टाकतो. पण खरा चमत्कार घडतो तो गिळल्यावर थोड्या वेळाने मासा त्याला बाहेर टाकतो आणि आपल्या दिशेने निघून जातो. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असनू अनेकजण हैराण झाले आहेत, तर काहींनी त्या व्यक्तीचा जीव वाचला ते चांगले झाले असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.